You are currently viewing मेष राशीची साडेसाती सध्या चालु आहे.मकर राशीची साडेसाती

मेष राशीची साडेसाती सध्या चालु आहे.मकर राशीची साडेसाती

मेष राशीची साडेसाती सध्या चालु आहे.मकर राशीची साडेसाती

मित्रांनो MAHITI7 या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे.

मेष राशीची साडेसाती सध्या चालु आहे.मकर राशीची साडेसाती काही जणांची आता संपलेली आहे.

आज आपण शनीची साडेसाती म्हणजे काय व साडेसाती कोणकोणत्या राशीला चालू आहे ते पाहणार आहोत.

सर्वप्रथम साडेसाती म्हणजे काय ते आपण पाहूया . शनि जेव्हा आपल्या राशीच्या पाठीमागच्या राशीत येतो त्यावेळेस साडेसाती सुरू होते , व आपल्या राशीमध्ये येतो तेव्हा सुद्धा साडेसाती चालू असते , व आपल्या राशीच्या पुढच्या राशीत जातो त्यावेळेस सुद्धा साडेसाती चालू असते. राशी म्हणजे चंद्र राशी . आपल्या जन्माच्या वेळेस चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्मराशी असते.

शनी एका राशीत अडीच वर्ष असतो. असे तीन राशीत मिळून साडेसात वर्ष होतात . त्यामुळे शनिच्या एकूण तीन राशीत फिरण्याच्या काळाला साडेसाती म्हणतात.

हा झाला स्थुल नियम पण ओरिजनल साडेसाती तशी सुरू होत नाही. खरी साडेसाती सुरू होते ती आपल्या जन्म चंद्राच्या पाठीमागे 45 अंशावर शनी आला की आपली साडेसाती सुरू होते. व आपल्या जन्म चंद्राच्या पुढे 45 अंशावर शनी निघून गेला की आपली साडेसाती संपते.

मेष राशीची साडेसाती सध्या चालु आहे.मकर राशीची साडेसाती काही जणांची आता संपलेली आहे.

याचा अर्थ काय , आज एक ऑगस्ट 2024 रोजी सकाळी साडेपाच वाजता. शनी कुंभ राशीत 24 अंश 29 कला आहे . समजा आपण गणितासाठी 24 अंश धरू. शनि 45 अंश आपल्या जन्म चंद्राच्या पाठीमागे आल्यावर साडेसाती सुरू होते व आपल्या जन्म चंद्राच्या 45 अंश पुढे निघून गेल्यावर साडेसाती संपते .

आज शनि कुंभ राशीत 24 अंश आहे त्याच्या आधी 45 अंश म्हणजे मकर राशीत 9 अंश. म्हणजे ज्यांचा जन्म चंद्र मकर राशित 9 अंश आहे त्यांना सध्या साडेसाती सुरू आहे . व ज्यांचा जन्म चंद्र मकर राशित 9 अंशापेक्षा कमी आहे म्हणजे सात आठ पाच अंश त्यांची साडेसाती आता संपलेली आहे.
सध्या शनि हा वक्री आहे व तो मागे मागे जात आहे त्यामुळे ज्यांची साडेसाती आता संपलेली आहे त्यांची सुद्धा परत सुरु होऊ शकते.

सध्या शनि कुंभ राशीत 24 अंश आहे त्याच्यापुढे 45 अंश म्हणजे मेष राशीत नऊ अंश असेपर्यंत सध्या साडेसाती चालू आहे . म्हणजे आता ज्यांचा जन्म चंद्र मेष राशीत नऊ अंश पर्यंत आहे त्या सर्वांना आता सध्या साडेसाती सुरू झालेली आहे. म्हणजे मेष राशीला सध्या साडेसाती चालू झालेली आहे.

ज्यांचा जन्म चंद्र मेष राशीत नऊ अंशापेक्षा जास्त आहे त्यांना आता सध्या साडेसाती सुरू झालेली नाही. पण शनिचे जसे जसे अंश वाढत जातील तसे तसे नऊ अंशाच्या पुढे मेष राशीत जे जे अंश असतील त्या सर्व मेष राशीच्या लोकांची साडेसाती सुरू होईल.

तुमच्या जन्म चंद्राचे अंश किती आहेत ते आजच तपासा. तुमचा जन्म चंद्र जर मेष राशीत नऊ अंश असेल तर तुम्हाला आता सध्या साडेसाती सुरू झालेली आहे. ज्यांचा जन्मचंद्र मकर राशित नऊ अंशापेक्षा कमी असेल त्या सर्व मकर राशींच्या लोकांची साडेसाती आता संपलेली आहे.

शनीची साडेसाती म्हणजे काय व शनिची साडेसाती कोणकोणत्या राशीला चालू आहे

मित्रांनो साडेसातीचे हे गणित तुम्हाला कोणीही सांगणार नाही. सर्वजण हेच सांगतील की मेष राशीची साडेसाती 2025 मध्ये सुरू होणार आहे पण तसे नाही . काही मकर राशीच्या लोकांची साडेसाती आता संपलेली आहे त्यांनी काळजी करण्याची गरज नाही.

मुळात साडेसाती मध्ये त्रास हा ग्रहमानामुळे होत असतो साडेसातीमुळे नाही . कारण तुमची महादशा चालू असते व ती महादशा व अंतर्दशा ज्या भावाशी संबंधित असते त्याच भावाची फळे तुम्हाला मिळतात . आणि त्या महादशा स्वामीचा व अंतर दशा स्वामीचा शनीशी कसा संबंध आलेला आहे त्यावर साडेसातीचे फळे मिळतात.

समजा महादशास्वामी व अंतर्दशा स्वामीपासून शनी चार आठ व बारावा साध्या लग्न कुंडली प्रमाणे जर असेल तर त्या महादशात व अंतर दशामध्ये त्रास होतो.

आता आपण शनी कोणकोणत्या भावामध्ये असल्यानंतर काय काय फळ मिळेल ते बघूया.
शनि जर पहिल्या भावामध्ये साध्या लग्न कुंडलीप्रमाणे नाही , भावचलित पत्रिकेप्रमाणे , ज्याला कस्प कुंडली असेही म्हणतात. जर असेल तर तुमच्यामध्ये चिकाटी निर्माण होईल पण तुमच्यामध्ये निराशा सुद्धा निर्माण होईल . तुम्हाला कोणत्याही कामामध्ये लवकर यश मिळणार नाही त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.

जर शनि दुसऱ्या भावामध्ये असेल तर कुटुंबामध्ये वयस्कर लोक हे जास्त असतात. कुटुंबामध्ये त्यांचाच अधिकार जास्त चालतो. धन मिळण्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतात.

शनी जर तिसऱ्या भावामध्ये असेल तर लहान भावडांशी सहसा पटत नाही . प्रवासामध्ये अडचणी निर्माण होतात .लेखन कार्यामध्ये विलंब लागतो. सरकारी डॉक्युमेंट मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होतात.

शनी जर चौथ्या भावामध्ये बसला असेल तर जुने घर मिळते. वाहन सुद्धा जुनेच घ्यावे लागते. शिक्षणामध्ये अत्यंत अडचणी निर्माण होतात . मॅथ या विषयामध्ये विशेष रस नसतो.
शनी जर पंचम भावामध्ये असेल तर प्रेम प्रकरणात यश मिळत नाही . संतती होण्यास सुद्धा खूप अडचणी निर्माण होतात. मुलांशी सहसा पटत नाही. खेळामध्ये व कलेमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात.

शनी जर सहाव्या भावात असेल तर नोकरीच करावी लागते .बिजनेस सहसा होत नाही . नोकर प्रामाणिक मिळतात . नोकरीत पैसा अपेक्षेपेक्षा कमीच मिळतो.

शनि जर सातव्या भावात बसलेला असेल तर विवाहात अनेक अडचणी निर्माण होतात . विवाह झाल्यानंतर सुद्धा वैवाहिक सुख कमी मिळते. नवरा किंवा बायको नोकरीच्या निमित्ताने दूर राहतात त्यामुळे वैवाहिक सूख हे कमी मिळते. बायको नेहमी माहेरी निघून जात राहते त्यामुळे अडचणी निर्माण होतात . भागीदारी व्यवस्थित चालत नाही भागीदारांमध्ये मतभेद निर्माण होतात.

शनी जर अष्टम भावामध्ये असेल तर आयुष्य भरपूर असते.विम्यातून किंवा ग्रॅज्युटीतून किंवा कुठल्यातरी फंडातून पैसे मिळू शकतात.

शनी जर नवंम भावामध्ये असेल तर शिक्षणात अत्यंत अडचणी निर्माण होतात . प्रबंध लिहिल्या जात नाही. प्रवासात सुद्धा अडचणी निर्माण होतात . वडिलांशी सहसा पटत नाही.

शनी जर दशम भावामध्ये बसलेला असेल तर बिजनेस किंवा नोकरी उशिरा सुरू होते. पण असा शनि राजकारणात यश मिळवून देऊ शकतो . वकिलीमध्ये सुद्धा यश मिळू शकते.

शनि जर अकराव्या भावामध्ये असेल तर तो अतिशय चांगला असतो . मित्र हे मोठ्या वयाचे असतात. मोठ्या भावंडाशी सहसा पटत नाही.

शनि जर 12 व्या भागांमध्ये असेल तर अतिशय त्रास निर्माण होतो. साडेसातीत जास्तच त्रास निर्माण होतो . शनी जर बारावा भावामध्ये असेल तर अशा लोकांनी प्रामाणिक राहावे कुठलेही बेईमानीचे काम करू नये . अशा कामांमध्ये ते सहसा अडकू शकतात किंवा त्यांना सजा होऊ शकते.

शनि जर आठव्या व बाराव्या भावामध्ये असेल व ग्रहमान सुद्धा खराब असेल तर अशा साडेसाती मध्ये त्रास होऊ शकतो. सहसा साडेसाती चा त्रास हा ग्रहमानामुळे होत असतो.

मेष राशीची साडेसाती केंव्हा सुरु होणार आहे

मित्रांनो ही माहिती फक्त एका भावात असलेल्या शनि ग्रहाबद्दल दिलेली आहे . पण आपल्या पत्रिकेमध्ये एका भावात कधी कधी अनेक ग्रह असतात किंवा त्या ग्रहांच्या युती किंवा दृष्टी असतात. त्यामुळे त्यात बदल होऊ शकतो. तसेच आपल्या पत्रिकेतील प्रत्येक भावाचा उपनक्षत्र स्वामी हे ठरवत असतो की पत्रिकेमध्ये काय फळ मिळणार आहे .

मित्रांनो तुमची जर जन्म वेळ बरोबर असेल तरच तुमची पत्रिका खरी ठरू शकते. जन्मवेळेत जर तीन मिनिटांपेक्षा जास्त फरक पडला तर पूर्ण भविष्य बदलू शकते. कारण जुळ्या मुलांच्या पत्रिकेमध्ये चार ते पाच मिनिटं किंवा तीन मिनिटं फरक असतो त्यामुळे त्यांचे भविष्य हे वेगवेगळे असते .

त्यामुळे जन्मवेळ ही अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे . खूप जणांना प्रश्न पडतो की जन्मवेळ नेमकी कोणती घ्यावी, जन्मवेळ ही नाळ कापल्यानंतर जी वेळ असते ती घ्यावी.

साडेसाती व त्यावरील ऊपाय

साडेसाती मध्ये शनीचा जप करणे शनीचे दर्शन करणे त्याचबरोबर प्रामाणिक राहणे , गरीब लोकांना मदत करणे हे अत्यंत जरुरी आहे. नुसताच जप करून किंवा नुसतेच दर्शन घेऊन होणार नाही आपले वागणे सुद्धा प्रामाणिक असले पाहिजे . तरच साडेसातीचा त्रास कमी होईल.

शनीचे हे भाव भावचलित पत्रिकेप्रमाणे बघावे . साध्या पत्रिकेप्रमाणे बघू नये. साधी पत्रिका ही फक्त राशीसाठी आवश्यक असते. कुठलेही भविष्य सांगण्यासाठी भावचलित पत्रिका महत्त्वाची असते. बरेच जण साधी जन्म पत्रिका बघून भविष्य सांगतात ते अत्यंत चुकीचे आहे.

मित्रांनो आज आपण शनिच्या साडेसाती बद्दलची माहिती पाहिली आहे . तुम्हाला जर अशीच नवीन नवीन माहिती बघायची असेल तर MAHITI7 या web site ला सबस्क्राईब करा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला अशी नवीन व गुढ माहिती कोणी सांगणार नाही. ती माहिती तुम्हाला फक्त या साईटमध्येच बघायला मिळेल .

धन्यवाद मित्रांनो!

Leave a Reply